Tuesday, 27 December 2016

तुकोबांचे अभंग

1.
हेचि थोर भक्ती आवडती देवा,
संकल्पावी माया संसाराची ॥
ठेविले अनंते तैसेची राहावे,
चित्ती असो द्यावे समाधान ॥
वाहील्या उद्वेग दु:खची केवळ,
भोगण्याचे फळ संचिताचे ॥
तुका म्हणे घालू तयावरी भार,
वाहू हा संसार देवा पायी ॥
2.
जे का रंजले गांजले
त्यासी म्हणे जो आपुले ॥
तोचि साधू ओळखावा
देव तेथेचि जाणावा ॥
मृदू सबाह्य नवनीत
तैसे सज्जनांचे चित्त ॥
ज्यासि आपंगिता नाही
त्यासी धरी जो हृदयी ॥
दया करणे जे पुत्रासि
तेचि दासा आणि दासी
तुका म्हणे सांगू किती
तोचि भगवंताची मूर्ती ॥
3.
जेथे जातो तेथे तू माझा सांगाती,
चालविसी हाती धरूनिया ॥
चालो वाटे आम्ही तुझाचि आधार,
चालविसी भार सवे माझ्या ॥
बोलो जाता बरळ करिसी तें नीट,
नेली लाज धीट केलो देवा ॥
अवघे जन मज झाले लोकपाळ,
सोईरे सकळ प्राणसखे ॥
तुका म्हणे आता खेळतो कौतुके,
झाले तुझे सुख अंतर्बाही ॥

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.